प्रतिनिधि : कृष्णा महाले
मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी नुकतेच हिरा मॅरेज हॉल उल्हासनगर दोन येथे रोजा इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पाडली. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन साई पक्षाच्या अध्यक्ष जीवन इदनानी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. हिरा मॅरेज हॉल येथे शुक्रवारी सायंकाळी सात वाजता इफ्तार पार्टी झाली. यावेळी या कार्यक्रमास शुभेच्छा देताना ते म्हणाले की, सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणे सुद्धा महत्त्वाचे आहे.
दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधु भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे.
यावेळी मा. नगरसेवक, समाजसेवक, कार्यकर्ते अनेक राजकीय पक्षाचे नेते यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती व मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin