Ticker

6/recent/ticker-posts

अखेर आ. निलेश लंके यांनी दिला आमदारकीचा राजीनामा नगर दक्षिण लोकसभा लढण्यासाठी सज्ज

पाथर्डी प्रतिनिधी: ज्ञानेश कंठाळी 

 संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अहमदनगर लोकसभा लढवण्यासाठी नगर पारनेर विधानसभेचे आ. निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आज (दि.२९) मार्च रोजी दिला आहे. पारनेर  मध्ये झालेल्या सवांद मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली. 

ही घोषणा करताना आ. निलेश लंके हे भावुक झाले होते. नगर दक्षिण अर्थात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी हा राजीनामा देत व त्यांच्या आग्रहाखातर तसेच कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यात जोरदार सामना रंगणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.