प्रेम राठोड ग्रामीण प्रतिनिधी खेड
आर्णी तालुक्यातील खेड येथे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करताना खेड येथील नागरिक, व युवक.बंजारा समाज हा अतिशय प्राचीन समाज असून, या समाजाची आगळी - वेगळी बोली भाषा, वेशभूषा, सण त्योहार, विवाह, खानपान ,नृत्य, लेंगि, लोकगीत, ह्या कलागुणांनी समृध्द, व प्रसिद्ध असा हा बंजारा समाज भारतात सुप्रसिद्ध समाज आहे. प्रत्येक सण त्योहार एक विशिष्ठ व पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याची प्रथा ह्या समाजात आहे.
त्यातीलच एक प्रकार म्हणजे होळी हा सण अतीशय हिरारीने साजरा करण्यात येतो, यामध्ये अनेक प्रकारचे लेंगी, लोकगीते गायन करीत, विशिष्ट प्रकारचे पारंपरिक नृत्य करण्यात येतो. त्याचप्रमाणे पुरुष, महिला व नवयुवकांचा ह्या उत्सवामध्ये समावेश होतो. अतीशय सुंदर व दर्शनीय नृत्यांसोबत, व लोकगीत, लेंगी सोबत उत्सवाची सांगता करण्याची पद्धत बंजारा समाज करीत असतो.





Social Plugin