Ticker

6/recent/ticker-posts

महागांव येथे बंजारा तांड्यामध्ये होळीचा सण साजरा.


गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी 

  होळीचा सण आज संपूर्ण  महाराष्ट्रमध्ये बंजारा समाजात लेंगी नृत्य करून उत्साहात साजरा केला जातो  त्यामध्ये खास आकर्षण म्हणजे लेंगी नृत्य   बंजारा लोकगीतांनी आनंदानी सण साजरा होतो, आणि बंजारा लोकसंस्कृती बंजारा समाजात होळीच सण अगदी दिवाळीसारखाच साजरा होतो, लोकगीत हे बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीचे खास आकर्षण मानले जाते खर तर होळीच्याआधी माहुर तालुक्यातील बंजारा लोक दत्त शिखरावर  दतात्रेय यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्यापावन भूमीवर होळी सणाची बंजारा लोकगीत गाऊन सुरुवात करतात, या गीतांना लेंगी गीत असेही म्हटले जाते

 बंजारा समाजाचा हा होळी उत्सवहोळीच्या काळात फेर धरुन गायिला जाणार लोकगीत आणि या उत्सवातील महिलांचे नृत्य सुद्धा आकर्षित दिसत,कारण बंजारा समाजातील संस्कृतीचे  वस्त्र परिधान करुन पुरुषांच्या बरोबरीने डपच्या चालीवर फेर धरुन गीत सादर करतात, त्यालाच बंजारा समाजात पायी घालणे  असे सुध्द संबोधले जाते, यासोबतच अनेक रुढी  धुंड म्हणजे घरीमुलगा झाल्यांवर साजरा केलेला आंदोत्सव पण बंजारासमाजात होळी सणात धुंड आणि विशेष म्हणजे बाळाचे धुंड केल्याशिवाय होळीला महत्व देखील येत, नाही अशी असते,अशी बंजारा समाजामध्ये होळीचा सण साजरा केला जातो.