वाई प्रतिनिधी, राहूल पिसाळ.
साधारण 350 वर्ष पूर्वी पासून चालू असलेला आणि सुगीचे दिवस संपल्यानंतर करमणूक म्हणुन आणि पद्मावती आई साहेब यांचा वारसा आणि आशीर्वाद असलेला उत्सव. साळी आळी आणि माळी आळी यांच्या चित्र देखाव्यांनी महाराष्ट्र राज्यतील लाखो नागरिकानी सोंगे पाहण्यासाठी गर्दी केली होती.त्यात दोन्ही आळी चे आभार पोलीस प्रशासनाने मानले त्यांनी साऊंड न लावता दिलेल्या नियमांचे पालन करत पारंपरिक वाद्य ढोल ताशा आणि हलगीच्या आवाजाने सारी ओझर्डे नगरी दुमदुमून गेली आणि महोत्सव निर्विघ्न पार पडला.
त्यात महाराष्ट्रामधील ज्वलंत विषय यावर विविध चित्र रथ सादर केलें होते शेतकऱ्यांची आत्महत्या, पौराणिक राधा कृष्ण, बाळूमामा, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई. स्त्री शिक्षण जनक सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले. पाचीपांडव, पद्मावती आई साहेबांचे दोन रथ, स्वामी समर्थ, हनुमान. गजानन महाराज, शेतकरी राजा यांसारखे विविध सामाजिक, पौराणिक, चालू घडामोडींवर चित्ररथ करण्यात आले त्यात दोन्ही आळी कडून अगदीं हुबेहूब पात्र वटवण्यात आली पहाटे 4 वाजता चालू झालेली सोंगे सकाळी 7.30 वाजता पूर्ण झाली.





Social Plugin