प्रतिनिधी दीपक गुरव चाळीसगाव
चाळीसगाव : येथील स्टेशनरोड स्थित एचडीएफसी बँकेत बहुसंख्य व्यापाऱ्यांचे सीसीचे खाते आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बँकेत रोख भरणा केल्यावर अधिक भरणा शुल्क गैरवाजवी व अन्यायी शुल्कची आकारणी लावण्यात आली आहे. ही शुल्क आकारणी गैरलागू, बेकायदेशीर व अन्यायकारक आहे, अशी कोणत्याही स्वरूपाची शुल्क आकारणी कोणतीच बँक सीसी खातेधारकांकडून आकारत नाही.
ही शुल्क आकारणी बँकेने त्वरित बंद न केल्यास राष्ट्रीय राज्यव्यापी संघटनेद्वारा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चाळीसगाव व्यापारी असोसिएशनने बँकेचे मॅनेजर यांना निवेदनाद्वारा दिला आहे. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र देशमुख, हरेश जैन, राहुल कारवा, अनिल बंग, डॉ. संजय माळी यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते.





Social Plugin