Ticker

6/recent/ticker-posts

घरगुती सिलिंडरचा वापर होतोय हॉटेल व्यवसायासाठी महसूलच्या पुरवठा विभागाचे दुर्लक्ष, कारवाईची मागणी


प्रतिनिधी दीपक गुरव  चाळीसगाव

घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर हॉटेल आणि इतर व्यवसायासाठी होत आहे. मात्र, पुरवठा विभागाचे दुर्लक्ष का ? पुरवठा विभाग त्यांच्यावर कारवाई करेल का? असे एक ना एक प्रश्न उपस्थित होत आहे. घरगुती सिलेंडरचा वापर हा घरगुती वापरासाठी झाला पाहिजे. कमर्शियल सिलेंडरचा वापर हा उद्योगासाठी झाला पाहिजे, यासाठी महसूलच्या पुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुरवठा विभागाने त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे

हॉटेल रेस्टॉरंट, मटन हॉटेल, चायनीज, पावभाजी, पाववडा, चहा दुकान, दूध डेअरी प्रॉडक्ट्स, फॅक्टरीपाव बेकरी, केक शॉप, मिठाई स्वीट दुकान, सुवर्ण कारागिरी काम, रोडलाईन कटर काम, वेल्डिंग कटर काम, मोठमोठे लॉन्स, मंगल कार्यालयातील आचारी आदी कमर्शियलऐवजी ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर करतांना दिसतात. हे सर्वजण जीएसटी, इन्कम टॅक्स, कर टॅक्स वाचविण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातच सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडतो. महागाईवर भर पडते म्हणूनच गॅस सिलेंडर हे महागडे होण्यास सुरुवात होते. त्यामुळे घरगुती सिलेंडरचा हॉटेलासह इतर व्यवसायासाठी होणारा वापर थांबविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.