Ticker

6/recent/ticker-posts

अवैध धंदे बंद करण्याच्या मागणी साठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी आक्रमक


लोणार: अनिल वायाळ प्रतिनिधी

लोणार शहर व तालुक्यातील अवैध घंदे येत्या ७ दिवसात बंद न केल्यास १८ मार्च पासून लोणार पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण करण्याचा ईशारा तालुका काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष राजेश श्रीराम मापारी यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेन्द्र फडवणीस यांना निवेदनाद्वारे ११ मार्च रोजी दिला आहे,

निवेदनात नमूद आहे की जागलिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या लोणार शहरात पोलीस विभागाच्या आशीर्वादाणे अवैध धंदे सुरु आहेत. गावोगावी घरपोच देशी दारू मिळत असल्याने एका वर्षात ग्रामिण भागातील २३ तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत, वरळी आहे, चकया, पले, राज्यात गुटखा बंदी असताना खुलेआम गुटखा विक्री सुरु आहे. पोलीस विभाग हप्ते घेऊन अवैध धंद्याना बालना देत आहे, 

याला शासन अभय देत आहे. यामुळे तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. गृहमंत्री यांनी जिल्ला पोलीस अधीक्षक यांना अवैध्य धंदे बंद करण्याचे आदेश दयावे अन्यथा येत्या १८ मार्च रोजी काँग्रेस पक्षच्या बलीने लोकशाही मार्गाने पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण करणार असून माझ्या जीवित्यास काही थोका निर्माण झाल्यास किंवा कायदा व सुव्यवसेचा प्रशन उपस्थित झाल्यास याथी जवाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असा ईशारा काँग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष राजेश मापारी यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.