Ticker

6/recent/ticker-posts

महिला दिनानिमित्त सन्मान प्रत्येक गृहिणीचा हळदी कुंकू समारंभ संपन्न


प्रतिनिधि कृष्णा महाले उल्हासनगर 

        हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत विचार आणि कार्यसम्राट आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या संयुक्त विद्यमान व शिंदे गटाचे उपशहर प्रमुख संदीप डोंगरे आणि समाजसेविका वंदना संदीप डोंगरे यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान प्रत्येक गृहिणीचा यानिमित्ताने हळदी कुंकू कार्यक्रम उल्हासनगर-४ राजपती शिवाजी प्राथमिक शाळा, हनुमान मंदिर, कुर्ला कॅम्प जवळ, आयोजित हळदी कुंकू समारंभ सौभाग्यवती मान हळदी कुंकवाचा कार्यक्रमात  स्त्रियांना विरंगुळाम व मनोरंजनाचा त्यांच्या कलेला वाव व उत्स्फुर्त प्रतिसाद देण्यासाठी कार्यक्रम  म्हणून खेळ पेठणीचा कार्यक्रम घेण्यात आला  विजेतेना पेठनी साडी देण्यात आले तसेच  लकी ड्रॉ काढण्यात आले  त्यात प्रथम विजेत्यांना प्रेशर कुकर , इस्त्री, मिक्सर, व घरगृती इतर आकर्षक बक्षीस व भेटवस्तु दिले गेले  या कार्यक्रमात हरेश गुंजाळ यांच्या सहकार्याने  व विभागातील सर्व महिलावर्गाने हळदी कुंकूच्या कार्यक्रमात हजारो महिलांनी उत्स्फुर्तपणे कार्यक्रमांत सहभाग घेतला