चाळीसगाव प्रतिनिधी - अनिल राठोड
मोटार वाहन विभागाच्या चाळीसगाव येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. चाळीसगाव येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्याला पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार संजयभाऊ सावकारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्षा स्मिताताई वाघ, शेंदुर्णी येथील संजयदादा गरुड, दुध संघ संचालक रोहित निकम, पारोळा माजी नगराध्यक्ष करण पवार, मधुभाऊ काटे, अमोल नाना पाटील, यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,दळवळण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यानिमित्ताने मंत्री महोदय व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात दोन वाहन धारकांना MH52 नंबर ची पासिंग नोंदणी देण्यात आली. चाळीसगाव तालुक्यासाठी हा ऐतिहासिक क्षण असून राज्यात नव्हे तर देशभरात MH52 ही आपली वेगळी ओळख निर्माण होणार आहे. भारतीय जनता पक्षाने संधी दिली, ना.गिरीशभाऊ महाजन यांनी विश्वास दाखवला आणि चाळीसगाव तालुक्याच्या जनतेने आशिर्वाद दिले म्हणून मी हे काम करू शकत आहे. त्यामुळे MH52 चाळीसगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चाळीसगाव वासीयांना नम्रपणे अर्पण करत आहे.
राज्यात गेल्या 13 वर्षात राज्यात कुठेच RTO कार्यालय मंजूर झाले नाही. प्रशासकीय स्तरावर एखादी गोष्ट करायची असेल तर त्यासाठी प्रचंड पाठपुरावा करावा लागतो. ना.गिरीश भाऊंचे आशिर्वाद तसेच महायुती सरकार यामुळेच हे कार्यालय मंजूर करणे शक्य झाले. चाळीसगाव तालुक्यात जवळपास सव्वालाख वाहने आहेत या वाहनांचे पासिंग, फिटनेस आदी कामासाठी जवळपास 120 किमी जळगांव येथे जावे लागत होते ते आता होणार नसून सर्व कामे चाळीसगाव येथे होणार आहेत. तसेच सदर मैदानावरील कार्यालय तात्पुरते असून नवीन कार्यालय बांधकामासाठी बिलाखेड येथील शासकीय जागा मागणी केली आहे व इमारत बांधकामाचा ३७ कोटींचा प्रस्ताव देखील पाठवला आहे.
यासोबतच चाळीसगाव तालुक्यात आज एकाच वेळी चाळीसगाव शहरातील महापुराचे प्रमुख कारण असलेल्या हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या मोदी आवास योजनेतील भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या महाराष्ट्रातील पहिल्या 259 घरांच्या वसाहतीचे बोढरे येथे भूमिपूजन, तालुका क्रीडा संकुल येथे नूतनीकरण व अद्ययावतीकरण आदी कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चाळीसगाव तालुक्यातील २०२१ मधील महापूरग्रस्तांना ६ कोटींची मदत मिळाली असून दुष्काळग्रस्तांसाठी 133 कोटी 23 लाख रुपये मंजूर झाले आहेत, लवकरच ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका व तिसऱ्या क्रमांकाचे शहर मात्र साधी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत नव्हती, नाट्यगृह नव्हत, आज चाळीसगाव शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पंचायत समिती, कोर्ट, उत्पादन शुल्क, नाट्यगृह, रेस्ट हाउस, पोलीस हौसिंग आदी इमारती काम सुरु असून व काही काम पूर्ण देखील झाले आहेत. पदापेक्षा कामात जास्त विश्वास ठेवणारा मी कार्यकर्ता आहे. चाळीसगाव तालुक्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी माझा प्रयत्न आहे.
- आमदार मंगेश रमेश चव्हाण





Social Plugin