प्रतिनिधी/ प्रशांत सोनवणे
फलटण दि.०७ जागतिक महिला दिनानिमित्त निरगुडी ग्रामपंचायत निरगुडी व मलाबार गोल्ड अँड डायमंड्स शाखा बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने महीला दिनानिमित्त निरगुडी ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी जिल्हा परिषद शाळा निरगुडी येथील प्रांगणात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सरपंच सौ.कोमल सस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करून महीला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी निरगुडी येथील भरपूर महिलांनी सहभाग नोंदविला व शोभा वाढवली. होम मिनिस्टर पैठणीचे मानकरी म्हणून सौ.अश्विनी अजित गोरे यांना मान मिळाला तसेच अनेक महिलांनाही बक्षीसे देण्यात आली. निरगुडी ग्रामपंचायतीच्या या वेळी उपस्थित सरपंच,सौ.कोमल सचिन सस्ते , उपसरपंच सौ.सारिका महाविर बनसोडे,व सर्व ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,मलाबार गोल्ड अँड डायमंड शाखा बारामतीची संपूर्ण टीम,महिला नवरात्र उत्सव मंडळ निरगुडी, सर्व महिला उपस्थित होत्या. निरगुडी ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच लाईट व साऊंड सिस्टीमचे ज्यांनी उत्कृष्ट काम केले असे श्री.बाळासो सुतार यांचेही ग्रामपंचायतच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.





Social Plugin