दि. 31 मार्च 2024 रविवार वेळ सकाळी 10:00 ते 2:00 वाजेपर्यंत केबीटी इंजिनिअरिंग कॉलेज गंगापूर रोड नाशिक येथे राष्ट्रीय कृषीभूषण एक्सलन्स अवॉर्ड 2024 वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.सुनील पवार मा. संचालक पणन मंडळ महाराष्ट्र व्यवस्थापकीय संचालक मार्केटिंग बोर्ड महाराष्ट्र प्रमुख पाहुणे मा.श्री. मोहन वाघ विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग व मा. श्री. विवेक सोनवणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक तसेच जितेंद्र शहा नोडल अधिकारी स्मार्ट नाशिक आणि श्रीमती ज्योती सुरसे प्रभारी महाराष्ट्र भारतीय कृषक समाज नवी दिल्ली तसेच माननीय श्री प्रशांत महाजन मराठी हिंदी अभिनेते वरील मान्यवरांच्या हस्ते ग्राम गायवळ येथील शेतकरी रवींद्र गायकवाड यांना सेंद्रिय शेतीमध्ये विस्तार शिक्षणाचे महत्त्वपूर्ण भूमिका व जनजागृती व नैसर्गिक शेतीला चालना व प्रशिक्षण दिल्याबद्दल कृषी भूषण अवॉर्ड सेंद्रिय शेती महाराष्ट्र राज्यां मधून निवड करून सन्मानित करण्यात आले
आयोजक समिती प्रमुख मा. श्री भूषण निकम चेअरमन कृषीभूषण एफपीओ स्टार्टअप फेडरेशन महाराष्ट्र राज्य, रोहिणी पाटील संचालक कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांनी ग्राम गायवळ येथील शेतकरी रवींद्र गायकवाड यांनी कृषी उद्योगाला चालना देणारे प्रयोग आपल्या शेत बांधावरती राबवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लखपती किसान हा प्रयोग दिला यामध्ये चिया सीड, किंनवा सीड व मोहरी अल्प खर्चाचे पिका शून्य खर्चाचे प्रयोग करून शेतकऱ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले शेतकऱ्यांना ऑन फॉर्म प्रोडक्शन ऑफ बायो इनपुट चे महत्व पटवून देऊन शेत बांधावरती बायो इनपुट ची निर्मिती औद्योगिक दृष्ट्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्प व शेतीला पूरक व्यवसाय गावरान कुकुटपालन व फळ रोपवाटिका, भाजीपाला रोपवाटिका , नाडेप कंपोस्ट, बायो डॉयनामिक कंपोस्ट, बायोगॅस निर्मिती, पारंपारिक ऊर्जा स्त्रोत चा वापर करून फळबाग लावगड, मिश्र फळपीक पद्धती, विहीर पुनर्भरण, देशी गोपालन बकरी पालन मधमाशी पालन, बांधावरती शेवगा लागवड अशी विविध उपक्रम आपल्या शेतावरती राबवून तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिल्याबद्दल कृषी आधारित विविध उपक्रम आपल्या शेतामध्ये राहून शेतकऱ्यांना फळबाग चे महत्व पटवून देऊन मोठ्या प्रमाणावर कृषी विस्तार शिक्षणाचे कार्य रवींद्र गायकवाड यांच्या हातून होत असल्यामुळे तसेच मॅनेज हैदराबाद याचे मास्टर फॉर्मर म्हणून कृषी सखी यांना प्रशिक्षित केल्याबद्दल व नैसर्गिक शेतीला गटशेतीच्या माध्यमातून चालना देऊन वाशिम ऑरगॅनिक मिशन महासंघ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड वाशिम स्थापना करून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कंपनीला जोडून उत्पादित झालेला नैसर्गिक शेतमाल विक्री व्यवस्थापना करिता विविध प्रयोग राबत असल्याबद्दल राष्ट्रीय कृषी भूषण सेंद्रिय शेती 2024 एक्सलंन्स अवॉर्ड नी सन्मानित करण्यात आले. करिता रवींद्र गायकवाड यांची सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे





Social Plugin