प्रतिनिधि कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर : उल्हासनगरातील सुभाष टेकडी परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक हे प्रसिद्ध चौक असून सुभाष टेकडीत मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आहेत. चौकात असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्या ऐवजी आता पूर्णकृती भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. या चौकाचे काम गेल्या दोन महिन्यापासून वेगाने सुरू आहे. 80 लाख किमतीचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा सुभाष टेकडीतील आंबेडकर चौकात उभारण्यात येणार असून त्या पुतळ्याचे लवकरच अनावरण होणार आहे. चौकाचे काम प्रगतीपतकावर सुरू असून त्या ठिकाणाची नुकताच सोमवारी सायंकाळी इंटर नॅशनल धम्मदीप सोसायटीचे संस्थापक भन्ते आनंद महाथेरो यांनी पाहणी केली.
सुभाष टेकडीतील चौकात भव्य दिव्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण झाल्यावर या पुतळ्यामुळे उल्हासनगरचे नाव इतिहासात इतिहासात जाणार आहे. व उल्हासनगरचे नाव निश्चितच पावन होणार आहे. यासाठी मी स्वतः चौकाचे काम सुरू असलेल्या या ऐतिहासिक ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलो आहे व या कामात आमचेही लक्ष व्हावे भिकू संघाचा आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण होण्यासाठी आणि यासाठी सर्व कार्यकर्त्यांना व सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांना मी शुभचिंतन देतो आणि आपल्या सर्वांचे जीवन आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच सुधारले आहे.
आर्थिक दृष्ट्या भरपूर सुधारले परंतु त्याचप्रमाणे सामाजिक दृष्ट्या सुधारल्या पाहिजे. यासाठी हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एक आदर्शमय होणार आहे. त्याच्यातून विधान पूर्वक जे असा पुतळा उभारणार आहे असे मी ऐकले तर ते निश्चितच त्या बाबासाहेबांचे जे लक्षण आहेत जे असे हात देऊन ते आपल्या समाजाला, तुम्हाला आदेश देत आहे सर्वांनी एक व्हा. सर्वांनी आता एक व्हायलाच पाहिजे कारण एक झालं तर त्याची शक्ती फार मोठी आहे. म्हणून आपल्या सर्वांचा मी आभारी आहोत. यासाठी मी आज विशेष आशीर्वाद देण्यासाठी या पुतळ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे म्हणून मी या ठिकाणी आलो आहे असे भन्ते आनंद मात्रे यांनी सांगितले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष अरुण कांबळे साहेब, इंटर नॅशनल धम्मदीप सोसायटीचे संस्थापक भन्ते आनंद महाथेरो श्री आनंद बागडे साहेब श्री सारंग थोरात श्री आर एस गवई श्री प्रकाश भागे , डॉ व्ही व्ही पोपेरे साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते





Social Plugin