Ticker

6/recent/ticker-posts

लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या विद्यार्थ्यांना मेंटोरीया संस्थेच्या वतीने करीयर संदर्भात समुपदेशन



कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

मंठा: लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या विद्यार्थ्यांना मेंटोरीया संस्थेच्या वतीने करीयर संदर्भात समुपदेशन करण्यात आले. विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचे आहे, या संदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या मध्ये असलेल्या गुणांचा आधारे समुपदेशन करण्यात आले. 

      लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून काम करत आहे. मुलांचा सर्वागिण विकास व्हावा या साठी 2008 पासुन जालना जिल्ह्यात मंठा, जालना, बदनापुर व परतूर या ठिकाणी काम करते आहे. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साठी ही मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

विद्यार्थ्यांना स्वतच्या पायांवर उभे करण्याचे काम ही संस्था करत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे काम ही सामाजिक संस्थेच्या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातूनच करत आहे. या समुपदेशनात वेगवेगळ्या सेंटरच्या विद्यार्थ्यांना करीयर संदर्भात विविध संधीच्या संदर्भात माहिती मिळाली. 

या मध्ये जालना जिल्ह्यातील सर्व सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सहभागी या घेतला होता. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात जाऊन आपले करीयर हे घडवावे हे सांगण्यात आले. या मध्ये विद्यार्थ्यांना विविध करीयर संदर्भात प्रश्न विचारून माहिती मिळवली आहे.