लोणार: अनिल वायाळ प्रतिनिधी
राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याचे मोलाचे कार्य खेळ संस्कृती करते असे प्रतिपादन प्रा.डॉ. गोपाल बशिरे यांनी क्रिकेट सामनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना केले.
अजीसपुर येथे पार पडलेल्या बारा दिवसीय क्रिकेट सामन्यात मोठ्या संख्येने खेळाडू संघ सहभागी झाले होते त्यातून चार संघास बक्षीस देण्यात आले. पहिलं पारितोषिक 21000 रुपये दुसरे 11000 रुपये तिसरे 7000 रुपये व चौथे पारितोषिक 5000 रुपये अशी पारितोषिकांची शृंखला होती या बक्षीस वितरण समारंभात डॉ. बशिरे यांनी मार्गदर्शन केले त्यात पुढे म्हणाले की, आजची भारताची सामाजिक व धार्मिक परिस्थिती चिंताजनक आहे समाजा समजामध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे दुषकार्य होत आहे परंतु खेळाडू हा दुसऱ्या खेळाडूची जात-पात धर्म पंथ न बघता एका जीवाने एका ताकतीने एकसंघ होऊन आपला खेळ खेळतो आणि या माध्यमाने राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याचे मोलाचे कार्य खेळ संस्कृती करते.
या सामन्याचे आयोजन सिद्धेश्वर वाकुडकर, रमजान शेख यांच्यासह अजीजपुर खेळ प्रेमी ग्रामस्थांनी केले होते या प्रतियोगितेत लोणार येथील तीन संघ, अजीजपुर येथील दोन संघ, बन येथील दोन संघ, गोत्रा येथील दोन संघ, पांगरा डोळे येथील दोन संघ, सावरगाव मुंढे, वझर आघाव, जांबुल देवठाणा, शिरपूर असे एकूण 16 क्रिकेट संघ सहभागी झाले होते या प्रतियोगितेत लोणार येथील संग्राम बॉईज संघाने ज्या संघात लोणार चे पोलीस उपनिरीक्षक राजेश घोगरे हे खेळत होते त्यानि प्रथम पारितोषिक पटकावले पांगरा डोळे येथील संघाने द्वितीय पारितोषिक, देवठाणा येथील संघाने तृतीय तर अजिस्पूर संघाने चतुर्थ पारितोषिक पटकावले पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी मंचकावर डॉ. गोपाल बशिरे यांच्यासह लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश घोगरे, नगरसेवक गजानन जाधव सर, सचिन डहाळके, सुदन अंभोरे सर, संतोष कुडाळ, अल्ताफ शेख, दस्तगीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती या समारोहाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक वाकुडकर यांनी केले तर आभार सिद्धेश्वर वाकुडकर यांनी मांनले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





Social Plugin