अरूण मैदमवार. भद्रावती. ग्रामीण प्रतिनिधी .
Rccpl सिमेंट कंपनी तालुका झरी, जिल्हा यवतमाळ, ह्या कंपनी ला मुकुटबन डोलोमाइट खाण ,वनक्षेत्र ४६७.४५ हेक्टर लिझ मध्ये मिळाली आहे, हे क्षेत्र वाघांचे अस्तित्व असलेले,टिपलेशवर व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात, वाघांचे भ्रमण मार्गात येतो. ही वनजमिन वाघांचे अस्तित्व असलेले भ्रमण क्षेत्र असल्याने,वर्ष २०१० पासून वादग्रस्त होती. शासनाच्या अहवालानुसार कंपनी ने मोठ्या प्रमाणात वन्यजीव संरक्षण हेतू निधी खर्च केला असल्याचे दिसून येते, परंतु प्रत्यक्षात हा निधी खर्च झाल्याचे दिसून येत नाही. फक्त कागदोपत्री खोटे अहवाल दाखवून शासनाची दिशाभूल करून खाण मंजुरी करून घेतल्याचं दिसून येते. हया वनजमिन खाण पट्टा साठी,राज्य वन्यजीव संरक्षण मंडळाने दिलेल्या नियमांचे कंपनी कडून उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असताना, कंपनीने जुने खाणकाम गड्डे पुनर्भरण न करता खाणकाम चालू केले आहे.
ह्या वनक्षेत्रात असंख्य प्रमाणात झाड असताना, झाडांची संख्या अहवालात कमी दाखवून दिले आहे, एकुण 413 हेक्टर क्षेत्रात 17719 झाडं असल्याचे अहवाल मध्ये दाखवून दिले आहे, परंतु प्रत्यक्षात ह्या वनक्षेत्रात लाखोंच्या संख्येने झाड असल्याचे दिसून येत आहे,ह्या मध्ये घोटाळा दिसून येत आहे.हया विषयावर प्रादेशिक वन विभाग अधिकारी व स्थानिक वन अधिकारी चे सुस्त निद्रिस्त पणा, ह्या क्षेत्रात भ्रमण करणार्या वन्यजीवांना गंभीर धोका निर्माण होऊ शकते. ह्या विषयावर जनप्रतिनिधी चे डोळे झाक पणा व स्थानिक लोकांच्या उदासीनता मुळे वनसंपत्ती व वन्यजीवांचे जीव धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे, लवकरात लवकर शासन व वनविभाग ने त्वरित चौकशी करून कंपनी चे खाणकाम बंद करण्यात यावे.
ह्या संदर्भात अरूण मैदमवार सामाजिक कार्यकर्ता द्वारा प्रादेशिक वनविभाग पांढरकवडा ह्यांना तक्रार दाखल करून ही अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसून येत नाही. ह्या वरून ह्या कंपनी चे स्थानिक जनप्रतिनिधी व वन अधिकारी सोबत काय साटेलोटे सुरू आहे. असं प्रश्न सामान्य नागरिकांना उपस्थित होते आहे. ह्या विषयावर लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक लोकांकडून होत आहे.





Social Plugin