बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
सातारा येथीलधनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तथा आयबीपीएस सेंटर मधीलविद्यार्थ्यांनी आयबीपीएस परीक्षेत यश प्राप्त झाले आहे. प्रतिवर्षी देशातील राष्ट्रीयकृत बँकांमधील प्रोबेशनरी ऑफिसर्स व क्लर्क भरती करिता इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन या संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातीलविद्यार्थ्यांची आयबीपीएस द्वारे अंतिम निवड करण्यात आलेली आहे.
श्री. हेमंत सकटे व श्री. सुरज शिंदे यांची बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झालेली आहे तर श्री. विजय थोरात यांची पंजाब नॅशनल बँकेत आणि श्री. महेश जगताप यांची बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्लर्क म्हणून अंतिम निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य व सहसचिव (उच्च शिक्षण) मा. प्रिं. डॉ ज्ञानदेव म्हस्के, मा. सहसचिव (माध्यमिक) श्री. बंडू पवार उपप्राचार्य, प्रो. डॉ विठ्ठल सावंत, प्रो.डॉ गणेश जाधव, आयबीपीएस सेंटरचे समन्वयक डॉ विजय कुंभार, डॉ. टी. डी. महानवर, डॉ. सचिन सूर्यवंशी, प्रा. विजय पाटील, प्रा. किशोर संकपाळ, प्रा. संतोष अमंदे, प्रा. बाजीराव नरळे, कार्यालय प्रमुख श्री. अशोक मसने तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





Social Plugin