प्रतिनिधी अर्जुन घोडेराव@ येवला
बोकटे तालुका येवला या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले श्री. काशिनाथ वाणी सर यांची बोकटे केंद्रात केंद्रप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे उर्दू शाळेचा देखील केंद्रप्रमुख म्हणून पदभार देण्यात आला आहे. याप्रसंगी त्यांचा सत्कार करताना स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथील सेवानिवृत्त प्राचार्य श्री. दत्ता नागडेकर सर , येवला तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह तथा मुख्याध्यापक श्री. अर्जुन घोडेराव सर , एन्झोकेम विद्यालय येवला येथील उपप्राचार्य श्री. कैलास धनवटे सर तसेच कालिका शाळेचे शिक्षक महेश अहिरे सर हे उपस्थित होते.उपस्थिती मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.





Social Plugin