Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर उमेदवार

सचिन एलिंजे प्रतिनिधी

   महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या जागेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून कल्याणमध्ये महायुतीचे श्रीकांत शिंदे आणि महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांच्यात लढत होणार आहे. ठाकरे पक्षाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात वैशाली दरेकर यांना कल्याणमधून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत उमेदवारांची नावे जाहीर केली. 2009 मध्ये वैशाली दरेकर या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणुकीत उभ्या होत्या, त्यांना एक लाखाहून अधिक मते मिळाली होती. २०१० मध्ये ते कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेतेपद त्यांनी भूषवले. 2009 पूर्वी त्या शिवसेनेत होत्या, त्यानंतर त्या मनसे सोडून शिवसेनेत आल्या. पक्ष फुटल्यानंतर त्या निष्ठावंत म्हणून शिवसेनेत राहिल्या.