Ticker

6/recent/ticker-posts

नदीच्या पात्रातील रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर वर मंडळ अधिकारी गजानन सुरोशे यांची धडक कारवाई



बाळासाहेब पवार प्रतिनिधी

उमरखेड तालुक्यातील जेवली परिसरामध्ये सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पैनगंगा नदीच्या पात्रातील अवैधरीत्या रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर मंडळ अधिकारी गजानन सुरोशे व तलाठी पंजाब सानप, कोतवाल वासुदेव जुकोटवार यांनी सापळा रचून कारवाई केली. सदर ट्रॅक्टर पोलीस स्टेशन बिटरगाव येथे आणून प्रथम खबरी अहवाल नोंदविण्यात आला.

सकाळी साडेपाच वाजता च्या दरम्यान विना नंबरचे ट्रॅक्टर हेड व ट्रेलर असलेल्या स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर पैनगंगा नदी पात्रातून अवैधरीत्या रेती वाहतूक करताना आढळून आली त्यामुळे मंडळ अधिकारी यांनी चालकास थांबवून ट्रॉलीमध्ये असलेल्या रेतीचा परवाना बाबत विचारपूस केली त्यावेळी चालकाकडे कोणताही परवाना नव्हता चालक दिगंबर बुटले राहणार बिटरगाव यांनी सदर रेती पैनगंगा नदी पात्रातून चोरून उत्खनन व वाहतूक करून आणल्याचे सांगितले स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच 29 सीबी 0546 व ट्रॉली क्रमांक एम एच 29 सीबी 1337 जप्त करून पोलीस स्टेशन बिटरगाव येथे लावलेला आहे.

सदर ट्रॅक्टरची अंदाजे किंमत रु. 800000/- व एक ब्रास रेतीची किंमत रु. 8000/- आहे. चालकांनी पैंजण नदी पात्रातून रेतीची चोरी करून जेवली गावात रेतीची विना गौण खनिज परवाना वाहतूक केल्यामुळे सदर चालकावर भा. द. वि. धारा 379 व म. ज. म. स. 1966 चे धारा 48(7), 48(8) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.उमरखेड तहसील कार्यालयात अनेक तलाठी व मंडळ अधिकारी कार्यरत असताना केवळ गजानन सूरोषे मंडळ अधिकारी चोखपणे कर्तव्य बजावताना दिसत आहेत.