Ticker

6/recent/ticker-posts

महायुतीकडून उमेदवार घोषणेची शक्यता



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याचा तिढा अजून कायम आहे कारण महायुती मधील सर्वच पक्ष आपला हक्क या जागेवर संगत आहे. मात्र हा प्रश्न आज (दि. २५) सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकची जागा तशी शिवसेनेची असली तरी भाजप व राष्ट्रवादीच्या दाव्यामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आम दार राजाभाऊ वाजे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली आहे. 

मात्र महायुतीकडून अद्याप नाशिकमधून कोण लढणार हे स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपण निवडणूक लढणार नाही असे सांगत माघार घेतली, मात्र कोण लढणार ही जागा याबाबत काहीच भाष्य केले नाही. त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीकडून कोणता उमेदवार निवडणूक लढणार या फैसल्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुजबळांनी माघार घेतली तरी भाजपकडून गोडसेंना सिग्नल मिळालेला नसल्याने सस्पेन्स कायम आहे.