Ticker

6/recent/ticker-posts

ओझर्डे येथे रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली


वाई प्रतिनिधी- राहुल पिसाळ देशमुख.

       वाई तालुक्यातील एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओझर्डे या ठिकाणी रामनवमी उत्साहात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी रामनामाने अगदी दुमदुमून गेली. ओझर्डे मधील श्रीराम मंदिरात रंगबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी रोषणाईने मंदिरामध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला. राम जन्मला ग.. सखी राम जन्माला… या गाण्यांवर महिलांनी चांगलाच ताल धरला होता. सकाळी12 वाजता सुंठवडा वाटून राम जन्म आनंद साजरा केला.

        सियावर रामचंद्र की जय!,  पवनसुत हनुमान की जय!, प्रभू रामचंद्र भगवान की जय!,अशा जयघोषाने थोरले राम मंदिर व परिसर दुमदुमून गेला होता. किर्तन, भजन,आणि श्रीरामाच्या नामस्मनाने मंदिरातील वातावरण भारावून गेले होते. वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांसह ओझर्डे परिसरातील भाविक भक्त व लोकांची प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी राम मंदिरामध्ये दिवसभर वर्दळ सुरु होती. सातारा लोकसभाचे उमेदवार श्री शशिकांत शिंदे हे सुध्दा आवरजून उपस्थतीत राहिले होते. 

श्रीराम कृषी उद्योगचे श्री.राजेंद्र नारायण फरांदे, मुंबई पोस्ट ऑफिसर विजय नारायण फरांदे आणि शिक्षक धनंजय नारायण फरांदे यांनी समाजमंदिरमध्ये महप्रसदाचे योग्य आणि भरपूर नियोजन केले होते गावातील सर्व ज्येष्ठ पुरुष, महीला भगिनी आणि युवक वर्गानी त्याचा लाभ घेतला . मदत केली असा हा कार्यक्रम पार पडला .