ग्रामीण प्रतिनिधि:- सोनु राठोड
माहूर तालुका कॉंग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक उमरा येथे फार्महाउस वर दि. १४ रोजी संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते माजी सभापती मा. माधवराव पाटील हडसनीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उपाध्यक्ष मा. विठ्ठलराव पावडे, वि.आ.भ.ज. सेल चे जिल्हाध्यक्ष मा. किसन दामा राठोड, युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव मा. डॉ. निरंजनजी केशवे,डॉ.सुपियाताई गांवडे, नूर भाई माहुरकर,मुरलीधर हंबर्डे, मुकेश पटणे, शौकतभाई वडसेवाले, तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख शिऊरकर , शहराध्यक्ष अजीम सय्यद,युवानेते कृष्णकुमार दत्तराम राठोड, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. नूतन तालुकाध्यक्ष बाळासाहेब देशमुख शिऊरकर, माहूर शहराध्यक्ष अजीम सय्यद, अल्पसंख्यांक सेल माहूर तालुकाध्यक्ष करीम शहा तय्यब शहा यांचे नियुक्ती बद्दल अभिनंदनचा ठराव संमत करण्यात आला. व तालुका, शहर व अल्प संख्याक सेल च्या नवीन पदाधिकारी यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी ता.महासचिव जयकुमार अडकीने, नगरसेवक निसार कुरेशी, विक्रम राठोड, राजू सौंदलकर, कृउबास संचालक गणपत मडावी, जयकांत मोरे, लुकमानभाई, गफारभाई, आदीसह कॉंग्रेसचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते तथा विविध गावाचे सरपंच, चेअरमन व तालुक्यातील प्रत्येक गावातील कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मा. नागेश पाटील आष्टीकर यांनी समारोप प्रंसगी हजेरी लावून कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागेश पाटील आष्टीकरांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला. सूत्रसंचालन अमजदखान हैदरखान पठाण यांनी केले.





Social Plugin