Ticker

6/recent/ticker-posts

वादळी वाऱ्यासह पाऊस मका गहू ज्वारी कांदा तिळाचे आतोनात नुकसान.


संतोष अटकर@ग्रामीण प्रतिनिधी

उगवा येथे 9 एप्रिल 24 गुढीपाडवा सायंकाळी 5 वा अवकाळी वादळी वाऱ्यासह विजाच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावत वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यात उन्हाळी ज्वारी मका तीळ गहू कांदा भाजी पाला या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्यासह पाऊसाने हिरावला आहे.यात शेतकरी खूप हवालदिल झाला आहे. त्यात अनेक लोकांची वादळी वाऱ्यामुळे घरावरील छते टिन पत्रे उडाली आहे. झाडे रस्त्यावर पडलेली दिसत आहेत.विजेचे तार तुटले आहेत.तरी प्रशासनाने नुकसानग्रस्तांना शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे.