Ticker

6/recent/ticker-posts

नाशिक मनपाचा उष्माघात कक्ष सतर्क



कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)

नाशिक - शहरात देखील आता उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले  आले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात उष्माघात (हिट स्ट्रोक) कक्ष तयार केले असून कथडा येथील डॉ. जाकीर हुसैन, मायको सर्कल, मोरवाडी येथील रुग्णालयात देखील स्वतंत्र प्रत्येकी पाच बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने महापालिका सतर्क झाली आहे. शहरात सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उन्हामुळे नागरिकांच्या तब्येतीत बिघाड होत असल्याचे चित्र आहे. शहराचा पारा चाळीशीपर्यंत जात आहे. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या लक्षणे थकवा येणे, उच्च अथवा कमी रक्तदाब, चक्कर येणे, उलट्या होणे, स्नायूंमध्ये कडकपणा, सतत घाम येणे, त्वचेवर पुरळ, डोकेदुखी, श्वास घेण्यास समस्या, भीती व अस्वस्थ वाटणे. भर उन्हाळ्यात कमी पाणी पिऊन घराबाहेर पडले तर उष्माघात होईल, तसेच पाण्याच्या अभावामुळे होणाऱ्या अनेक रोगांचा सामना करावा लागेल.

शहरात ऊन वाढत असून नागरिकांनी काळजी घ्यावी. दुपारी बारा ते पाचदरम्यान शक्यतो घराबाहेर विनाकारण पडू नये. गरोदर, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळी घ्यावी, तसेच घरातीलच थंड पेय घ्यावे. असे आवाहन मनपा तर्फे करण्यात येत आहे. महापालिका विभागामार्फत उष्माघात कक्ष सज्ज करण्यात आला आहे.