Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगावच्या उपसरपंचपदी विशाल जाधव

बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगाव येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल मोहनराव जाधव यांची निवड झाली. विद्यमान उपसरपंच पृथ्वीराज जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंचपद रिक्त झाले होते.  दुपारी दोन वाजता सरपंच घनश्याम मसणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत श्री सेवागिरी रयत संघटनेचे सुरेश जाधव व श्री सेवागिरी नागरिक जनशक्ती संघटनेचे विशाल जाधव यांच्यात लढत झाली. १७ विद्यमान सदस्यांनी गुप्त मतदान पद्धतीने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यापैकी विशाल जाधव यांना ११, तर सुरेश जाधव यांना ६ मते मिळाली. निरीक्षक अमृत  नाळे व ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे यांनी विशाल जाधव यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.