Ticker

6/recent/ticker-posts

निवडणूकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर





प्रतिनिधी --माणिक चव्हाण 

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने खालील अनुसूचित दर्शवलेल्या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदारसंघात त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

खालील प्रमाणे लोकसभा निवडणूक मतदार संघाची यादी दिली आहे.त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहील

1,- मतदानाचा दिवस आणि वार व दिनांक

शुक्रवार, 19 एप्रिल 2024 रोजी

रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर

2,- मतदानाचा दिवस आणि वार व दिनांक

शुक्रवार, 26 एप्रिल 2024

बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

3,- मतदानाचा दिवस आणि वार व दिनांक

मंगळवार, 7 मे 2024

रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

4,- मतदानाचा दिवस आणि वार व दिनांक

सोमवार, 13 मे 2024

नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी व बीड 

5,- मतदानाचा दिवस आणि वार व दिनांक

सोमवार, 20 मे 2024

धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य व मुंबई दक्षिण या सर्व ठिकाणी मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी राहील