( चिखली.प्रतिनिधी ) राजेंद्र मोरे
मौलाना इस्तेक माना. चिखली तालुक्यातील मौजे असोला बुद्रुक येथे दिनांक 08/04/2024रोजी असोला बुद्रुक येथील मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीच्या आयोजन केले होते त्यामध्ये मौलाना इस्तेक माना यांनी हिंदू धर्म आणि मुस्लिम धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे उदगार असोला बुद्रुक येथील मजित मध्ये काढले त्यांनी भगवत गिता आणि कुराण हे कसे समान आहेत हे असोला बुद्रुक येथील हिंदू मुस्लिम व बंजारा समाज यांच्या लोकांना सांगितले तर हिंदू बांधवांना कुराणनाच्या प्रती भेट म्हणून दिल्या त्यामध्ये त्यांचे इतर धर्माविषयी किती आदर असतो हे दिसून येत आहे या कार्यक्रमासाठी अंढेरा येथील पत्रकार हनिफ भाई तसेच गुंजाळा येथील पत्रकार राजेंद्र मोरे तसेच त्यांचे सहकारी पत्रकार राहुल डोंगरदिवे निलेश डोंगरदिवे येथील समस्त मुस्लिम बांधव आलम भाऊ मित्र मंडळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य असोला.तसेच इतर गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले मौलाना इस्तेक माना यांनी मुस्लिम धर्म आणि हिंदू धर्म किती सौम्य आहे व दोघांचाही ईश्वर अल्ला एकच आहे हे आपल्या प्रवचनातून असोला बुद्रुक येथील मजित मध्ये हिंदू मुस्लिम सर्व बांधवांना समजावून सांगितले कुराणा च्या प्रती समस्त हिंदू बांधवांना भेट म्हणून दिली आहे





Social Plugin