संजय भरदुक प्रतिनिधी
मंगरूळपीर तालुक्यातील काही गावात मंगळवारी ९ तारखेला सायंकाळी 5 वाजता अवकाळी पाऊस व गारपीट झाली या गारपिटीने या गावातील सायखेडा,मानोली,निंबी,अरक तसेच शेलुबाजार परिसरात तील गोगरी,हिरंगी,चोरद या गावात गारपीट चा तडाखा बसला उन्हाळी पीक व फळबागचे तसेच कांदा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
तसेच जिल्ह्यातील अनेक भागात मंगळवारी वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस आणि गारपीट झाली.या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकरीवर संकट आले या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत.परिसरातील बागायती पिकांचे सर्व्हेक्षण करण्यात येवून शेतकरी यांना मदत देण्याची मागणी होत आहे तरी शासनाने यांवर उपाय योजना करून मदत करावी.





Social Plugin