Ticker

6/recent/ticker-posts

ओझर्डे येथे कृष्णामाई ला जलपर्णी चा विळखा.



वाई प्रतिनिधी, राहुल पिसाळ .

संपूर्ण सातारा जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या कृष्णा नदीला या वर्षी पुन्हा एकदा जलपर्णीने विळखा घातलाय. वाई जवळील ओझर्डे गावाजवळ असलेल्या सोनेश्वर येथील पुलावरून नदीचं रूप पाहिल्यास सर्वत्र पाण्यावर जलपर्णीची हिरवी चादर पसरल्यासारखं दृश्य दिसून येतंय. या जलपर्णीमुळे नदीतील पाण्यातला ऑक्सिजन कमी होऊन, जलचरांना खाद्य न मिळाल्यास नदीतील जलचर प्राणी नष्ठ होण्याची भीती असते. मागे एकदा हिंदी सिनेमाच्या शूटिंग साठी म्हणुन ती आणली गेली होती ती आता पसरत पसरत एवढी मोठी झाली की कृष्णामाई चे खळखळणारे पाणीच दिसेनासे झाले आहे. ओझर्डे गावचे पिण्याचे पाण्याची सोय मागे त्या कृष्णामाई वरती होती परंतु आता उन्हाळा खुप वाढू लागला आहे त्यामुळं गावच्या विहीर चे पाणी आता कमी पडू लागले आहे त्यामुळं पुन्हा जर ही पर्यायी यंत्रणा चालू करायची झाली तर त्यासाठी जलपर्णी च्या विळख्यातून कृष्णामाई ला बाहेर काढले गेले पाहिजे,

यापूर्वी अनेक पर्यावरणवादी संस्थांनी कृष्णा नदी बचाव अभियानातून कृष्णा नदी स्वछ करण्यासाठी अनेक मोहीम राबवल्या. कृष्णा नदीवर जलपर्णीच विळखा वाढल्याने प्रशासन आणि पर्यावरणवादी संस्थांनी पुढाकार घेऊन नदीवर वाढत चाललेल्या जलपर्णीला नष्ठ करून कृष्णामाई ला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्याची गरज व्यक्त होऊ लागलीये.