कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
नाशिक - सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट कोणीही शेअर करू नये. सर्वांनी जातीय सलोखा आबादित ठेवावा असे आवाहन पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी केले. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे घडलेल्या घटनेच्या तसेच येणारे सण उत्सव या दरम्यान घ्यावयाच्या सुरक्षिते संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात शांतता समिती सदस्य यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे इत्यादि उपस्थित होते. यावेळी नितीन जाधव पुढे म्हणाले की, कोणीही सोशल मीडियावर दोन समाजात रिल्स, पोस्ट, भाषण, आक्षेपार्ह वक्तव्य प्रसारित करणार नाही, तसेच असे कोणी केल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. असे कोणी व्हायरल करीत असल्यास संबंधितावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सध्या आचारसंहिता चालू आहे त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या परवानगीशिवाय कुठलेही कार्यक्रम करू नये आदी महत्त्वाच्या सूचना जाधव यांनी केल्या.





Social Plugin