Ticker

6/recent/ticker-posts

देवडोंगरी येथे मतदार जनजागृती रॅली


ग्रामीण प्रतिनिधी: शंकर निंबारे देवडोंगरी 

    देव डोंगरी: आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यासाठी मोहीम सुरू आहेत स्वीप मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रमाअंतर्गत सोमवारी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देवडोंगरी गावात जनजागृती रॅली काढली. यात मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. सोडा सर्व काम चला करुया मतदान. आपल्या मताचे दान आहे 

    लोकशाहीची शान अशा विविध घोषवाक्यच्या गजरात मतदार जनजागृती करण्यात आली यावेळी प्राथमिक शाळेचे शिक्षक सदाशिव सोळे यांनी मतदान हा लोकशाहीचा हक्क आहे याविषयी ग्रामस्थ मतदारांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक भाऊराव पागी यांनी विद्यार्थ्यांना मतदार रॅलीचे महत्त्व पटवून दिले. रॅली मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा स्वंयसेविका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.