संतोष अटकर@ग्रामीण प्रतिनिधी
अकोला येथून जवळच असलेल्या उगवा येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 3 एप्रिल 24 रोजी गुढीपाडवा निमित्त श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी कथा श्रावणाचा लाभ घ्यावा ही विनंती.सर्व कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहतील.पहाटे 5 ते 6 काकडा व 9.30 ते 12 व दुपारला 3 ते 5 भागवत कथा आणि सायं 6 ते 7 हरिपाठ व रात्रीला 8.30 ते 10.30 हरीकीर्तनाचा कार्यक्रम राहील. व्यासपीठ नेतृत्व भागवत कथाकार ही ह भ प श्री शालिग्राम महाराज सुरडकर (रा भालेगाव ता खामगाव )
सप्ताहातील कीर्तन कार ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज पातोंड (रा वरुर जऊलका ता अकोट)यांची सेवा बुधवार 3 एप्रिल ला राहील. ह भ प भारतीताई धोटे (रा खामगाव जि बुलढाणा) गुरुवार 4 एप्रिल ला व ह भ प श्री सोपांन महाराज कान्हेरकर (रा मोर्शी जि अमरावती)शुक्रवार 5 एप्रिल ला ह भ प श्री पुंडलिक महाराज मलकापूरकर (रा देवाची आळंदी) शनिवार 6 एप्रिल ला ह भ प श्री शिवा महाराज बावस्कर विनोदा चार्य (रा मोर्शी जि अमरावती) रविवार 7 एप्रिल ला ह भ प श्री प्रा डॉ प्रशांत महाराज पातोंड (रा मोरगाव काकड ता जि अकोला) सोमवार 8 एप्रिल ला ह भ प श्री नंदू महाराज ढेंगे (रा म्हातोडी ता जि अकोला )मंगळवार 9 एप्रिल ला ह भ प श्री शालिग्राम महाराज सुरडकर यांचे काल्याचे कीर्तन राहील बुधवार 10 एप्रिल सकाळी 10 ला आणि भारुड सम्राट ह भ प श्री संतोष महाराज भालेराव यांचे सायं 8.30 ते 10.30 भारुड राहील.
गायनाचार्य ह भ प नंदु महाराज ढेंगे राम महाराज वाघ श्याम वाघ शेगाव श्रीकांत बोबडे निरंजन ढेंगे प्रशांत कालमेघ राजू ढेंगे मनोहर ढेंगे म्हांतोडी मंगेश महाराज ढेंगे सोपान महाराज ढेंगे प्रकाश महाराज पांडे कुटासा मंगेश जाधव खांबोरा योगेश ढोले पाळोदी. मृदुंगाच्यार्य ह भ प श्री ज्ञानेश्वर यादगिरे खंडाळा संदीप काळमेघ श्रीकृष्ण काळमेघ कासली विकास महाराज बाहकर अजय महाराज वक्टे पाळोदी टाळकरी मंडळी म्हातोडी पाळोदी कासली सांगवी बु कंचनपुर खांबोरा गोत्रा उगवा व पंचक्रोशीतील भजनी मंडळ मंगळवार 9 एप्रिल 24 पालखी व दिंडी राहील दिंडी सहभाग श्री गजानन मित्र मंडळ वाडी अदमपुर मोरेश्वर भजन मंडळ उगवा गुरुदेव सेवा भजन मंडळ उगवा हिराजी महाराज महिला मंडळ उगवा श्री संत गजानन महाराज महिला मंडळ उगवा . विशेष सहकार्य श्री मोरेश्वर संस्थान उगवा श्री मारोती संस्थान उगवा श्री सद्गुरू सेवा मंडळ उगवा (सावरबंध )श्री माय मंजुळा सेवा आश्रम उगवा श्री संत रोहिदास महाराम सेवा मंडळ उगवा . व बुधवार 10 एप्रिल 24 सकाळी 12 ते 3 वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम राहील पंचक्रोशीतील सर्वानी कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहान उगवा गावकरी मंडळी यांच्या कडून करण्यात आले आहे.





Social Plugin