Ticker

6/recent/ticker-posts

वाढीव कराची बेकायदेशीर नोटीस रद्द करा

 

शहरातील नागरिकांवर जाचक कर लादणाऱ्या नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीचा एल्गार, 

बाळासाहेब पवार प्रतिनिधी

नगरपरिषद उमरखेड चे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी नुकताच शहरातील नागरिकांवर वाढीव जाचक कर प्रस्तावित केला आहे. सदर वाढीव कराची बेकायदेशीर नोटीस दिनांक 15/3/2024 रोजी पासून अद्याप नागरिकांना देणे सुरू आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु शहरातील सत्ताधारी व विरोधक असलेले राजकीय नेते मात्र लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारांना निवडून आणण्यातच मशगुल आहेत त्यांना नागरिकांवर होत असलेल्या ह्या अन्यायाचा विसर पडला आहे 

असा आरोप छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीचे मुख्य मार्गदर्शक रज्जाक शाहिद, अध्यक्ष संपादक विलास चव्हाण व सचिव भीमराव दादा सोनुले यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक यांच्यावर केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी आज दिनांक 12/4/2024 रोजी सह्यानिशी लेखी निवेदन मुख्याधिकारी तथा प्रशासकाला देऊन वाढीव कर प्रस्तावित करणारी नोटीस बेकायदेशीर असून ती रद्द करावी व जाचक वाढीव कर रद्द करावा अशी मागणी केली आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी जर आमची मागणी पूर्ण केली नाही तर सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज रयत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी दिला आहे.