Ticker

6/recent/ticker-posts

आधी मतदान मग लग्न. गुंजाळा गावात नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क


चिखली प्रतिनिधि राजेंद्र मोरे 

 बुलढाणा लोकसभा निवडणुकीत नवं मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठा उत्साह दाखविला.यातच बुलढाणा लोकसभा निवडणुकीत नवरदेवाने आधी मतदान मग लग्न मतदानाचा हक्क बजाविला आहे.

     चिखली तालुक्यातील गुंजाळा गावातील संतोष लक्ष्मण केदार यांनी बहुल्यावर चाढण्याधी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.यावेळी परिसरातून संतोष चे कौतुक होत आहे.लोकशाहीचा पाय मजबूत होवा या उद्देशाने आपण मतदान करणे महत्त्वाचे आहे हे मतदान करून संतोष केदार नी सिद्ध केले लग्न म्हटले की आनंदाची पर्वणीच असते.त्याच बरोबर नागरिक म्हणून देशाचा विकासाचा कणा असलेल्या लोकशाहीत मतदान करून प्रतिनिधि संसदेत पाठवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे याचे भान सर्वांनी ठेवणे गरचेचे आहे.यासाठी नवरदेवाने मतदान हे मौलिक उदाहरण परिसरातील लोकांसाठी ठरले