प्रतिनिधी , रमजान शेख
पिंपरी, दि. २६ /०४/२०२४ :- मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने ३५ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले असून ३ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले आहे. तर ५० नामनिर्देशन पत्रांपैकी ४६ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून ४ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत ३८ उमेदवारांनी ५० नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली.





Social Plugin