(चिखली प्रतिनिधी )राजेंद्र मोरे
सध्या लग्न सराई जोरात सुरु असुन वरात असो किंवा मिरवणुकीत डीजे वाजविल्या जात असुन ज्या डीजेचा आवाज मोठा आहे त्यांचे पैसे ही डबल असुन आजकाल चटपट लागली आहे आपल्याला सर्वात मोठा आवाजाचा डीजे लावायचा या आवाजा मुळें वयस्कर लोकांना बिपि वाल्याना ञास होतो तर लहान मुले भितात व रोडवर राहत असलेल्या लोकांच्या घरातील भिती हादरा बसतो लहान मुलांच्या कानावर तर वयोवृद्ध व्यक्तींना हदया वरती परीणाम होतो
या मुळे आज दि 29.4.2024 रोजी पोलिस अधीक्षक साहेब बुलढाणा यांच्या आदेशानुसार पोलिस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील साहेबांनी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच पोलिस पाटील व पञकार बांधव यांना सुचना दिल्या की अंढेरा पोलिस स्टेशन च्या हद्दीत लग्न असो किंवा कोणत्याही प्रकारची मिरवणूक असो त्यांना पोलिस स्टेशनमध्ये येऊन डीजे असो किंवा बैड असो रीतसर परवानगी घ्यावी लागेल असे न केल्यास संबंधित डिजे वरती कार्यवाही करण्यात येईल असे ठाणेदार विकास पाटील यांनी सांगितले





Social Plugin