Ticker

6/recent/ticker-posts

डाॅ.गोपाल तुपकर यांच्या 'स्वानंद' व 'देव फार शिनला आहे ' या कविता संग्रह प्रकाशित



कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी

मंठा: जिल्हा परिषद शिक्षण विभाग जालना आयोजित शिक्षक साहित्य संमेलन आमची शाळा खरपुडी येथे पार पडले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना मॅडम, शिक्षणाधिकारी श्रीमती मंगल धुपे मॅडम, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती म्हेत्रेवार मॅडम व अध्यक्ष श्री. बसवराज कोरे सर यांच्या हस्ते डॉ. गोपाळ विठोबा तुपकर यांच्या दोन कवितासंग्रहाचे प्रकाशन पार पडले. 'स्वानंद' व 'देव फार शिनला आहे ' या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. डाॅ. तुपकर यांच्या नुकतीच   

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था,पुणे या जिल्हा कार्यकारिणीत सदस्य पदी निवड झालेला आहे. डाॅ. गोपाल तुपकर हे ग्रामीण कवी म्हणून चांगल्या पध्दतीने त्याचे लिखाण चालु आहे. आपला शिक्षकी पेशा सांभाळुन ते लिखाण करत आहेत. सतत वेगवेगळ्या कविता त्यांच्या सातत्याने येत आहे. आपण विविध पध्दतीने ते कविता लिखाण करत आहेत. त्यांचे विविध कविता संग्रह प्रकाशित झाले आहे. ग्रामीण भागातील विविध गोष्टीचे चिञण त्यामध्ये टाकण्याचे काम त्यांच्या कवितेतुन दिसुन येते आहे.  त्यांचा लिखाण मुळे त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार ही मिळाले आहे. या लिखाणाच्या व साहित्याचा माध्यमातूनच ते सतत वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण त्याचे चालु असते. 

या दोन कविता संग्रह प्रकाशित झाल्यामुळे साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या शुभेच्छा त्यांना मिळत आहेत. मंठा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. मंठा तालुक्यातील साहित्य क्षेत्रात चांगले लिखाण त्यांचे होत आहे, त्यामुळे आनंद व्यक्त केल्या जात आहे. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था,पुणे शाखा जालना जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष डाॅ.सुहास सदाव्रते यांनी कविता संग्रह प्रकाशित झाल्या बद्दल डाॅ.गोपाल तुपकर यांचे अभिनंदन केले आहे.