दीपक गुरव @ चाळीसगाव
गांवासमोरील गिरणा नदीपात्रातील वाळूत एका स्त्रीचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या स्थितीत दिसून आलेला आहे अशी माहीती वरखेडा बु।। ता. चाळीसगांव येथील पोलीस पाटील यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप परदेशी यांना त्यांच्या मोबाईलवर दिल्यानंतर संदिप परदेशी आपल्या पोलीस कर्मचा-यांसह घटनास्थळी पोहोचले. तेव्हा सदर ठिकाणी २०० ते ३०० लोक उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप परदेशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता या ठिकाणी त्यांना वाळूच्या ढिगाऱ्यात अर्धवट स्थितीत पुरलेले महिलेचे प्रेत दिसून आले. त्यांनी सदरची माहीती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच तहसिलदार चाळीसगांव आणि वैद्यकीय अधिकारी चाळीसगांव यांना कळविली आणि जळगांव येथून फॉरेन्सिक व गुन्हे शोध पथक आणि डॉग स्कॉड देखील घटनास्थळी बोलावून घेतले.
तहसिलदार व शासकीय पंच आणि ग्रामस्थ यांच्या समोर फॉरेन्सिक टिमच्या मदतीने वाळूच्या ढिगाऱ्यात अर्धवट स्थितीत पुरलेले महिलेचे प्रेत बाहेर काढले. तेव्हा महिलेच्या नातेवाईकांनी सदरचे प्रेत हे मायाबाई सजन मोरे (वय ३५ रा. वरखेडे खु।।) हिचे असल्याचे सांगितले. मयत महिलेच्या डोक्यावर दोन्ही कानाजवळ आणि डोळ्याजवळ तसेच छातीवर आणि मांडीवर चाकूसारख्या तिक्ष्ण हत्याराने व दगडाने जखमा केलेल्या होत्या.
तिच्यावर बलात्कार करून नंतर तिला जिवेठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तिचे प्रेत नदीपात्रातील वाळूच्या ढिगाऱ्यात अर्धवट स्थितीत बुजून ठेवण्यात आले होते असे पोलीसांच्या एकूण चौकशीत उघडकीस आल्याने पोलीसांनी गुप्तपणे या महिलेचा खून कुणी केला असावा या संदर्भातली माहीती घेतली असता त्यांना संशयिताचे नांव समजले. त्यानंतर पोलीसांनी पिंपळगांव म्हाळसा ता. चाळीसगांव येथील संतोष धोंडू भिल्ल यास ताब्यात घेतले. तो वरखेडे गांवापासून अवघ्या ३ कि.मी.वर राहत होता. त्याच्यात आणि मायाबाई सजन मोरे यांच्यात प्रेमसंबंध होते, त्यातून तो मध्यरात्री मायाबाईला भेटायला आला होता. त्याने तिला मक्याच्या शेतात नेले. या ठिकाणी दोघात कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्या संतोषने मिराबाईवर बळजबरीने अतिप्रसंग करून नंतर तिला धारदार शस्त्राने ठार मारले आणि तिचे प्रेत वाळूत पुरून टाकले. सदरची माहीती पोलीसांना आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडूनच मिळाली. विशेष म्हणजे पोलीसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या ३ तासात गुन्ह्यातल्या आरोपीला ताब्यात घेतले आणि मिराबाईचा जेठ सर्जेराव विक्रम धोंडू भिल्ल यास ताब्यात घेतले. तो वरखेडे गांवापासून अवघ्या ३ कि.मी.वर राहत होता. त्याच्यात आणि मायाबाई सजन मोरे यांच्यात प्रेमसंबंध होते, त्यातून तो मध्यरात्री मायाबाईला भेटायला आला होता. त्याने तिला मक्याच्या शेतात नेले. या ठिकाणी दोघात कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्या संतोषने मिराबाईवर बळजबरीने अतिप्रसंग करून नंतर तिला धारदार शस्त्राने ठार मारले आणि तिचे प्रेत वाळूत पुरून टाकले. सदरची माहीती पोलीसांना आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडूनच मिळाली. विशेष म्हणजे पोलीसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या ३ तासात गुन्ह्यातल्या आरोपीला ताब्यात घेतले आणि मिराबाईचा जेठ सर्जेराव विक्रम मोरे (वय ५० रा. वरखेडे खु।।) यांनी दिलेल्या तक्रारीवरून संतोषच्या विरोधात मेहुणबारे पोलीस स्टेशनला आय.पी.सी. ३०२, ३७६, ३२४, २०१ या कलमान्वये गुन्हा दाखल केला.
मिराबाईचे पार्थीव शासकीय रुग्णालयातशवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मिराबाईच्या खून्याला पकडणेकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप परदेशी, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, रमेश धडवजे, गोपाल पाटील, सहाय्यक फौजदार मिलींद शिंदे, पो.हे.कॉ. नितीन सोनवणे, पो.ना. दिपक नरवाडे, प्रकाश कोळी, पो.कॉ. गोरख चकोर, भुषण पाटील, सुदर्शन घुले, हनुमंत वाघेरे, जितुसिंग परदेशी, निलेश लोहार यांनी शर्थीचे प्रयत्न केले, त्यात त्यांना यश आले. मेहुणबारे पोलीसांनी सदरची कामगिरी ही जळगांवचे पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगांवच्या अप्पर पोलीस अधिक्षिका कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.





Social Plugin