Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाने महागाव तालुक्यात भोसा रेतीघाटावर धाड



बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

वि. उपविभागीय अधिकारी उमरखेड श्री. सखाराम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०४ मार्च २०२४ रोजी सकाळी २.०० वाजताच्या दरम्यान श्री. राजेश सुरडकर तहसीलदार उमरखेड, श्री. वरणगावकर तहसीलदार महागाव यांच्या नियंत्रणात महागाव तालुक्यातील भोसा रेती घाटावर घाटावर धाड टाकून बारा ट्रक, दोन पोकलेन, एक जेसीबी, पाच ट्रेझर बोट व्दारा रेती चोरी करून वाहतूक करीत असताना पकडून जप्त करण्यात आले. त्यामुळे रेती माफियाचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई मंडळ अधिकारी दत्तात्रय दुर्केवार , मंडळ अधिकारी मारोती एक्कुलवार, तलाठी प्रकाश मस्के , तलाठी प्रकाश हापसे, रामदास गारोळे, तलाठी गणपती क्षिरसागर , तलाठी सुशील सातदिवे , सतिश गजभार वाहन चालक विशाल पिंगाणे व धम्मदिप कांबळे यांनी पार पाडली.