बुध प्रकाश राजेघाटगे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भवानीनगर [पुसेगाव ] येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कु . सृजना भगवान सरवदे हिचा वकृत्व स्पर्धत प्रथम क्रमांक मिळविला .सम्यक बहुउद्देश्य प्रतिष्ठान सूर्यनगरी बारामती सम्यक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती . यामध्ये पुणे ,सातारा, परभणी, सोलापूर जिल्ह्यातील व बारामती या ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते या ठिकाणी दोन गटात स्पर्धा आयोजित केली होती . लहान गट इयत्ता दुसरी ते दहावी व मोठा गट मध्ये अकरावी ते पदवीधर आले होते .लहान गटात एकूण 62 स्पर्धक सहभागी झाले होते
त्यामधून कु . सृजना भगवान सरवदे हिचा प्रथम क्रमांक आला असून तिला रोख रक्कम,प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जयंती दिनी देऊन गौरव करण्यात आला . प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा .डॉ .मिलिंद कांबळे व सचिव किरण मोहिते तसेच प्रमुख पाहुणे डॉ .काकडे साहेब यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला .
याबद्दल शाळेतील सर्व शिक्षक - शिक्षिका , मुख्याध्यापिका प्रमिला घाडगे , रविंद्र ननावरे , सुभाष नाळे ,सोमनाथ पाटोळे , प्रतिमा सावंत, निलम बागेकरी, वर्षा सुर्यवंशी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल जाधव व सदस्य यानी सृजनाचे अभिनंदन केले तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक नातेवाईक व मित्र परिवार , कुटुंबातील सदस्य यांनीही अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .





Social Plugin