कीर्तीराज घुगे (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने स्मार्ट हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ४० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य सुविधा, त्याचबरोबर भौतिक सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल सर्व स्मार्टमधील वैद्यकीय अधिकारी यांची एकत्रित आढावा बैठक घेतली.
स्मार्ट उपक्रमामध्ये निवड झालेल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये दिशादर्शक फलक हे लावण्यात यावे, प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या " रस्त्यावर दिशादर्शक फलक असावे. त्याचबरोबर रुग्ण कल्याण समितीच्या बैठका या नियमित घेण्यात याव्या, आरोग्य विभागाच्या इ सुश्रूत प्रणालीचा वापर हा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात करून स्कॅन अँड शेअर या पद्धतीने आरोग्य समस्यांविषयी रुग्णांना समुपदेशन उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना यावेळी केल्या.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये भौतिक व आरोग्य सुविधा वाढवण्यात याव्यात व सर्व आरोग्य केंद्रांचा कायाकल्प करण्यात यावा, असे आवाहन यावेळी अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांनी केले.
.png)




Social Plugin