बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातून रेतीचे अवैध रित्या उत्खनन करून वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर रतन नाईक नगर व विडुळ येथे पकडले. प्रस्तुत कारवाई दिनांक चार एप्रिल रोजी मंडळ अधिकारी बिटरगाव यांनी केली. प्रस्तुत प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे मंडळ अधिकारी बिटरगाव श्री गजानन सुरोशे, तलाठी गजानन मोळके, कोतवाल वासुदेव जिंकूटवार यांनी दिनांक 4 एप्रिल रोजी सकाळी 6:30 वाजता गस्तीवर असताना त्यांना रतन नाईक नगर शेत शिवारात पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करत असताना ट्रॅक्टर नोंदणी क्रमांक एम एच २६ व्ही ७१२२ या ट्रॅक्टरने लाल रंगाची ट्रॉलीतून रेती चोरून वाहतूक करताना आढळून आले.
त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे रेती उत्खनन व वाहतूक परवाना नसल्याने ट्रॅक्टर व ट्रॉलीचा पंचनामा करून एकूण सहा लाख आठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला चालक पंकज कोठेकर राहणार सिरंजनी याच्या विरुद्ध पुन्हा नोंद करण्यात आला. तसेच त्या दिवशी दुपारी दोन वाजताची दरम्यान पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत विदुळ येथे रावसाहेब देवराये राहणार देवसरी यांचे ट्रॅक्टर नोंदणी क्रमांक एम एच 29 एके 27 17 यामध्ये एक ब्रास रीतीची वाहतूक करताना पकडले पंचनामा करून मुद्देमालाची जप्ती करून पोलीस स्टेशन उमरखेड मध्ये गुन्हा नोंद केला आहे.





Social Plugin