Ticker

6/recent/ticker-posts

लोकसभा मतदार संघ हिंगोली मध्ये एकूण 48 उमेदवारांचे अर्ज वैध


बाळासाहेब पवार ग्रामीण प्रतिनिधी

    लोकसभा मतदारसंघ हिंगोली मध्ये 55 उमेदवारांनी एकूण 78 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यापैकी दिनांक 5 एप्रिल रोजी छाननीअंती 55 उमेदवारांपैकी सात जणांचे नामनिर्देशन पत्र वेगवेगळे कारणांसाठी अवैध ठरविण्यात आले. त्यामुळे लोकसभा मतदारसंघ हिंगोली मध्ये एकूण 48 उमेदवार वैध ठरले. 

उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख 8 एप्रिल असून या दिवशी हिंगोली मतदार संघातील चित्र स्पष्ट होणार असल्याचे विद्यमान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. लोकसभा मतदारसंघ हिंगोली साठी होऊ घातलेल्या निवडणुकी करिता अर्ज छाननीची प्रक्रिया दिनांक 5 एप्रिल रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली. नामनिर्देशन पत्र वितरण आणि श्रीकृतीच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण 55 उमेदवारांनी 78 नामनिर्देशन अर्ज दाखल केले त्यापैकी सात उमेदवारांचे अकरा अर्ज छाननीअंती अवैध ठरविण्यात आले.