Ticker

6/recent/ticker-posts

रिक्षा चालकांकडून प्रवाशांची अडवणूक आणि लुटमार


प्रतिनिधी दीपक गुरव  चाळीसगाव

चाळीसगांव - मनमानी पध्दतीने रिक्षा भाड्याची आकारणी करणे, पॅसेंजरशी अरेरावी करणे असे प्रकार चाळीसगांव शहरात रिक्षा चालकांकडून नित्याचेच झालेले आहेत. या संदर्भात तक्रारी येवून देखील पोलीसांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने रिक्षा चालकांचा उन्मत्तपणा वाढलेला आहे. रात्री १० वाजेनंतर ज्या रिक्षा रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या असतात त्या रिक्षा चालकांकडून प्रवाशांची अक्षरशः लूट केली जाते. 

विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी वाशी वाहतुक करणा-य याच रिक्षा अशा आहेत न्यांचे पासिंग नाही, टॅक्स खील भरलेला नाही,अनिल नगरमध्ये राहतो, त्याने नवी कोरी रिक्षा घेतली आहे, तिचे पासिंग नाही, तिला नंबर मिळालेला नाहीतरी तो रात्रीच्या वेळी प्रवाशी वाहतुक करतो आणि अक्षरशः प्रवाशांची लूटमार करतो.

 प्रवाशांकडून अवाजवी भाडे घेतांना हा चिराग दादागिरी देखील करतो. रात्रीच्या वेळी रेल्वे स्टेशन परिसरात ज्या रिक्षा उभ्या असतात त्यांच्या अरेरावीला आणि मनमानी भाडे वसुलीला आळा बसावा यासाठी चाळीसगांव शहर वाहतुक शाखेच्या पोलीसांनी आणि शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.