Ticker

6/recent/ticker-posts

महायुतीचा महा मेळावा तालुका सालेकसा व तालुका आमगांव येथे आयोजित


प्रतिनिधि- हितेश मेश्राम

आज दिंनाक ६ एप्रिल २०२४ रोज शनिवारी भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिवसाचे औचित्य साधुन महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोक महादेवराव नेते यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार सभा तसेच महायुतीचा महा मेळावा तालुका सालेकसा व तालुका आमगांव येथे आयोजित करण्यात आले होते.

या मेळाव्याला महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार अशोक नेते यांनी‌ बोलतांना या क्षेत्रांत अनेक विकासाचे कामे खेचून आणून विकासाचे कामे केलेली आहे,३५/ ४० पस्तीस चाळीस वर्षा पासून बरोंनी रेल्वे थांबाचा प्रश्न होता तो सुद्धा माझ्या प्रयत्नशील कार्याने पूर्णत्वास आले.इंटरसिटी रेल्वे थांबाचा  सुद्धा जनतेचा प्रश्न आहे.या संबंधित पाठपुरावा व निवेदन रेल्वे मंत्री यांचे कडे सादर केला आहे. पुढे हा सुद्धा प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासित करतोय. बामनी धानोली पुलीया हा सुद्धा पुर्ण होईल.या क्षेत्रात रस्ते ,रेल्वे ,विकास कामे होतील.

अशी विनंती करत मला सेवा करण्याची संधी द्या.येणाऱ्या १९ तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.असे प्रतिपादन या मेळाव्याला उमेदवार तथा खा.नेते यांनी केले.मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी या मेळाव्याला मार्गदर्शन करतांना म्हणाले येणाऱ्या १९ तारखेला मतदान करून कमळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे प्रतिपादन यावेळी केले.माजी आमदार तथा भाजपाचे नेते डॉ.नामदेवराव उसेंडी यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार अशोक नेते यांचा मतदारांनी विजयाचा संकल्प करत भरगच्च मताने विजय निश्चितच होईल.असा विश्वास व्यक्त केला.

ता.सालेकसा येथील महायुतीच्या मेळाव्याला मंचावर प्रामुख्याने अन्न व औषधी प्रशासन मंत्री मा. धर्मरावबाबा आत्राम,माजी आमदार केशवराव मानकर,माजी आमदार भैरसिंहजी नागपुरे,माजी आमदार संजयजी पुराम,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, माजी.जि.प. अध्यक्ष विजय जी शिवणकर, जिल्हाध्यक्ष अँड.येशूलाल उपराडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू, जिल्हा महामंत्री अनिल येरने, तालुकाध्यक्ष गुमानसिंग उपराडे,आदिवासी नेते शंकरराव मडावी,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. अजय उमाटे,शिवसेना जिल्हा प्रमुख डॉ. साठवणे,गडचिरोली युवा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर,जिल्हा युवा सेना अर्जुनसिंग बैस,जिल्हा सचिव मुन्ना बिसेन, सामाजिक नेते  प्रभाकर दानोडे,दुर्गाताई तिराले,अर्चना ताई मडावी, परसराम फुंडे,लक्ष्मण नागपुरे, बाबुलाल उपराडे, तसेच या मेळाव्याला महायुतीचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ता.आमगांव येथील महायुतीच्या मेळाव्याला मंचावर प्रामुख्याने अन्न व औषधी प्रशासन मंत्री मा. धर्मरावबाबा आत्राम,माजी आमदार केशवराव मानकर,माजी आमदार भैरसिंहजी नागपुरे,माजी आमदार संजयजी पुराम,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, माजी.जि.प. अध्यक्ष विजय जी शिवणकर, जिल्हाध्यक्ष अँड.येशूलाल उपराडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष सुरेंद्र नायडू,राष्ट्रवादी नेते नरेश माहेश्वरी,जिल्हा महामंत्री अनिल येरने, तालुकाध्यक्ष राजू पटले, शहराध्यक्ष पिंटु अग्रवाल,जिल्हा सचिव नरेंद्र वाजपेयी, सभापती प.स.राजेंद्र गौतम,जेष्ठ नेते तथा माजी तालुकाध्यक्ष काशिराम हुकरे, संचालक टिकाराम मेढे,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश हर्ष,राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रोहीत शिरसागर, उपसभापती राजेश भटवर्ती, शिवसेना तालुका प्रमुख अनिल सोनवाने,जि.प सदस्य हनुमंत वट्टी,जेष्ठ नेते घनश्याम अग्रवाल,महिला तालुकाध्यक्ष अंजूताई बिसेन,शहराध्यक्षा शुषमा भूजाडे, तसेच या मेळाव्याला महायुतीचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..