Ticker

6/recent/ticker-posts

समृद्धी हायवे वर अपघाताची मालिका सुरूच

 कारंजा प्रतिनिधी  गुणवंत राठोड 

 कारंजा लाड 6/4/24 वे सकाळी 7:30 सुमारास सविस्तर  असे की पुण्यावरून यवतमाळ साठी निघालेल्या कार क्रमांक MH09AR0394  ही लोकेशन समृद्धी महामार्गावर चालकाला झोपेची डुलकी लागल्यामुळे अपघात होऊन ही कार डीवाईड वर आदळ ळी व त्यामध्ये तीन जण गंभीर स्वरूपाचे जखमी झाले. अपघाताची माहिती तात्काळ मिळताच लोकेशन शेलुबाजार 108 पायलट रवी शिंदे डॉ साहेब सैफुद्दीन  व कारंजा 108 लोकेशन समृद्धी हायवे  आतिश चव्हाण डॉ भास्कर राठोड सर हे तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे  आणले व येथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्यावर उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ साठी रेफर केले. 

जखमीचे  नावे. रोशनी पुंडे वय 14 शुभांगी सानप  वय 50   सुधीर सानप वय 32 रा यवतमाळ यावेळी समृद्धी महामार्गावरील अग्निशामक दल महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व हायवे पोलीस ही घटनास्थळी प्रामुख्याने मदतीसाठी हजर  होत्या. 108 समृद्धी रुग्णवाहिका ही खरोखरच अपघातग्रस्तांसाठी  तात्काळ हजर असते त्यामुळे बऱ्याच अपघातग्रस्तांचे प्राण वाचते. 108 मधील पायलट व डॉक्टर हे अपघात ग्रस्त रुग्णांची एका परिवाराप्रमाणे काळजी घेत असतात. त्यांच्या प्रथम उपचार करून धीर देण्याचे कामही ते करतात. त्यामुळे बऱ्याच अपघातग्रस्तांना एका परिवारासारखी मदत मिळत राहते.