Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन युवक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी विनोद उर्फ बंटी सौंदरमल यांची निवड


मारोती गाडगे/कटचिंचोली 

 गेवराई:-ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा  यांच्या स्वाक्षरीचे पत्र कडून बीड निरीक्षक अमोल लांडगे व  वंचित बहुजन आघडीचे युवक जिल्हा अध्यक्ष अनुरथ वीर यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई वंचित बहुजन युवक आघाडी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यात विनोद उर्फ बंटी सौंदरमल यांची वर्णी लागली आहे तर तालुका महासचिव सुदाम मोरे,राहुल त्रिभवण,तालुका उपाध्यक्ष सुधाकर केदार,गौतम वाव्हाळ,निजाम पठाण,शेख अखीलभाई रज्जाक,बाबासाहेब मुळीक,तालुका सहसचिव मगर गुलाबराव,भागवत जाधव, तालुका संघटक मिलिंद तायडे, सहसंघटक प्रकाश पाटेकर,ससाणे जनर्धन,कोषाध्यक्ष सचिन साळवे,सहकोषध्यक्ष गणेश ससाणे,सदस्य प्रशांत राऊत,राहुल तुरुकमारे,विनोद चव्हाण,सुनील कांबळे,संभाजी मुळूक,उमेश ससाणे,यांची निवड करण्यात आली आहे 

अधिक माहिती अशी की लोकसभा निवडणुका व विधान सभा  निवडणुका डोळ्यासमोर आल्याने वंचित बहुजन युवक आघाडी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे विनोद उर्फ बंटी सौंदरमल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती कळताच कार्यकर्त्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे व कार्यकर्ता मध्ये ऊर्जा निर्माण झाली आहे तसेच ठिकठिकाणी सत्कार करून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे विनोद उर्फ बंटी सौंदरमल हे भारिप बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडी चे माजी तालुकाध्यक्ष होते पक्षाने त्यांची तिसऱ्यांदा निवड केली त्यावेळी पक्ष वाडी साठी अथक परिश्रम करून  गाव तेथे शाखा स्थापन केलेल्या होत्या.