बाळासाहेब पवार प्रतिनिधी
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी उमरखेड तालुक्यातील श्री अमृतेश्वर महादेव मंदिर हरदडा येथे आपल्या प्रचाराचे नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली. यावेळी महाविकास आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले की मला प्रतिस्पर्धीच नाही त्यामुळे मी मोठ्या मताने निवडून येईल व विकासाचे अनेक कामे मतदार संघात खेचून आणिल असे आश्वासन दिले. यावेळी काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती राम देवसरकर, तातूभाऊ देशमुख, प्रकाश पाटील देवसरकर, हदगाव हिमायतनगर तालुका शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.





Social Plugin