Ticker

6/recent/ticker-posts

पैनगंगा नदी काठावरील ४९ गावात पाणी टंचाईचे संकट


प्रशासनास इशारा इसापूर धरणाचे पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन

बाळासाहेब पवार प्रतिनिधी

जानेवारी ते जून महिन्या दरम्यान दरवर्षी पैनगंगा नदी पात्रात इसापूर धरणाचे १० टी सी एम पाणी टप्प्या टप्प्याने सोडण्यात येते. परंतु यावर्षी २ महिने उलटूनही नदी पात्रात हक्काचे २ टी सी एम पाणी सोंडण्यात प्रशासनाला जमले नाही. त्यामुळे नदी काठावरील ४९ गावातील नागरिक व जनावरांवर पाणी संकट ओढवले आहे. या अनुषंगाने गुढीपाडव्याचे दिवशी मतखंदासह नदीकाठावरील ४९ गावातील नागरिकांसह माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर व माजी आमदार विजयराव खडसे यांनी राधाकृष्ण मंगल कार्यालय उमरखेड येथे बैठक घेतली. या बैठकीत येत्या ८ दिवसात नदी पात्रात पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला आहे.

 नदीकाठावरील ४९ गावातील नागरिकांना पिण्याचे पाण्याची भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. याशिवाय गावात मोठ्या प्रमाणात गुरेढोरे आहेत त्याच्या पिण्याचे पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे शेतात पिकं आहेत. पाणी कर लागला तरी चालेल पण शेतकरी जगला पाहिजे त्याचाही गंभीर विचार शासनाने केला पाहिजे. पैनगंगेच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे यासाठी कोणत्या स्वरूपाचे आंदोलन करायचे किंवा उपोषणास बसायचे यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार विजयराव खडसे, माजी जि. प. अध्यक्ष रमेश चव्हाण, भीमराव पाटील चंद्रवशी, माजी प. स. सभापती प्रज्ञानंद खडसे, बाबुराव भोयर व इतर मान्यवर हजर होते.